कुक्कुट पालन प्रोत्साहन आणि माहिती : अंडी उत्पादन
* अशाच विविध प्रकारच्या व्यवसाय विषयी संपूर्ण माहिती साठी लगेच आम्हाला आमच्या Page ला Follow करा.....
* Latest Updates मिळविण्यासाठी WhatsApp Group ला Join करा.....
Business Mentor Marathi Blog's
आज कमी कालावधि मधे तयार होणाऱ्या गावरान क्रॉस ब्रीड्स उपलब्ध आहेत त्यापैकी काहि खाली नोंदवल्या आहेत।
अंडी-उत्पादनासाठी कोंबड्यांच्या जाती
जेव्हा आपन गावरान अंडी उत्पादनाचा विचार करतो तेव्हा काही विशिष्ट जाती आपल्या डोळ्यांन समोर येतात त्यापैकी
– RIR ( ऱ्होड आइलैंड रेड ) (वजन वाढ धीम्या गतीने 6 महिन्यानंतर अंडी उत्पादन सुरु एका चक्रात 220 ते 250 अंडी उत्पादन सर्वोत्कृष्ट लेयर)
– ब्लैक अस्ट्रॉलॉर्प (सर्वोत्कृष्ट बहुपयोगी ब्रीड 3 महिन्यात 2 किलो पर्यन्त वाढ अणि एका चक्रत 160- 200 अंडी उत्पादन)
– ग्रामप्रिया 180 ते 200 अंडी
– देहलम रेड 200 ते 220 अंडी प्रती वर्ष उत्पादन
– गिरिराज (2 महिन्यात 1 किलो वजन वाढ अणि एक अंडी चक्रात 150 अंडी उत्पादन)
– वनराज (2 महिन्यात 1 किलो वजन वाढ अणि एका अंडी चक्रात 120 ते 160 अंडी उत्पादन)
– कड़कनाथ (औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध देशी वाण, धीमी वजन वाढ, परंतु पौष्टिक. 5 महिन्यात 1 किलो वाढ अणि एक चक्रात 60 ते 80 अंडी उत्पादन.)
ह्या जाती अतिशय काटक असून उत्तम रोगप्रतिकार शक्ति अंगभूत असलेल्या आहेत.
व्यवसाय कसा कराल
मुळात हा व्यवसाय मुक्त गोठ्या मधेच गायी-म्हैशी सोबत केला जाऊ शकतो, त्या साठी वेगळे काही करायची गरज नाही. देशी किंवा गावरान क्रॉस जाती ह्या अतिशय काटक अणि उत्तम रोगप्रतिकार क्षम असतात.
कुक्कुट पालन करत असताना जातीची निवड ही तुम्ही कोणत्या मार्केट साठी व्यवसाय करू इच्छिता यावर अवलंबून आहे .
मुख्य करून अंडी आणि मांस उत्पादन हे उद्दिष्ट असू शकते.
कुक्कुटपालन: डीप लीटर पद्धत आणि मुक्त संचार पद्धत

कुक्कुटपालन: मुक्त-संचार
शेतकऱ्यांनी मुक्त संचार पद्धत अवलंबिल्यास त्याचे अनेक फायदे आहेत.
मुक्त पद्धतीने संभाळ केल्यास 100 पक्षी अगदी कमी वेळ आणि भांडवल खर्च करुन व्यवसाय सुरु करता येतो. एक दिवसाची पिल्ले विकत घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता.
कोंबड्या मोकळ्या सोडल्यास उत्पादन प्रति अंडे अणि प्रति पिल्लू खर्च कमी होतो. सुरुवातीचे काही दिवस उदाहरणार्थ ३ आठवडे पिल्लांची काळजी घेतली जाते. ब्रूड केल जाते. अणि त्यांचा अंगावर पंख तयार होऊ लागताच त्यांना परसामधे मुक्त फिरण्यासाठी सोडले जाते.
नाही.
यामध्ये गरजेनुसार खाद्याची आणि पाण्याची भांडी ठेवावित. पिल्ले फार्म वर आणण्याआधी 24 तास ब्रूडर सुरु करुण योग्य रित्या चालत आहे अणि योग्य ते तापमान निर्माण करीत आहे याची खात्री करावी.
ब्रुडिंग करताना घ्यावयाची काळजी
ह्या अवस्थेत मरतुक होण्याची संभावना जास्त असते, त्यामुळे पुरेशी काळजी घेणे फार महत्वाचे असते.
– ब्रूडर चे तापमान योग्य राखने
– प्रामुख्याने खलील लसी देने
– लासोटा
– गंभोरो
– इन्फेक्शस ब्रोंकाइटिस
– फौलपॉक्स
– योग्य प्रमाणात प्रतिजैविक आणि जीवनसत्व द्यावीत.
– 18 ते 19 % प्रोटीन युक्त आहार ज्याला स्टार्टर म्हणतात तो द्यावा.
– 21 दिवस पूर्ण होताच पिल्ल ब्रूडर मधून लीटर वर हार्डेनिंग साठी सोडवित थोड़ी जागा वाढवावी.
* Latest Updates मिळविण्यासाठी WhatsApp Group ला Join करा.....
Business Mentor Marathi Blog's
एक दिवसाचे पिल्लू घेतल्यावर काय काळजी घ्याल ?
मध्यवर्ती अंडी उबवनि केंद्रातून किंवा खाजगी हॅचरी मधून एक दिवसाची पिल्ल 100 पिल्लू प्रति बॉक्स अश्या स्वरूपात पॅक करुन दिली जातात. शेतकऱ्यांनी पिल्ले पाहून विकत घ्यावीत. पिल्ले सुदृढ, निरोगी आणि चपळ असावीत. तसेच त्यांना पहिल्या दिवशी मरेक्स ही लस दिल्याची खात्री करावी.
पिल्ले प्रवासातून फार्मवर आणत असताना अलगद जास्त हेलकावे न देता आणावेत. फार्मवर पिल्ले पोहोचताच बॉक्स उघडून पिल्लांची मरतुक झाली आहे का ते पहावे. मेलेली पिले वेगळी काढावित. साधारण 1 लीटर उकळलेल्या पाण्यात 100 ग्राम गुळ किंवा एलेक्ट्रोल पाउडर मिक्स करुन, थंड करुन घ्यावे. नंतर प्रत्येक पिल्लाची चोच 2 ते 3 वेळा या पाण्यात बुडवून त्यास पाणी पिण्यास शिकवावे आणि नियंत्रित तापमान तैयार केलेल्या ब्रूडर मधे सोडावे.
पहिले काही तास गुळ पाणी पिने खुप महत्वाचे आहे. कारण गुळ पाण्यामुळे पिलांच्या आतड्यात असणारा चिकट पदार्थ बाहेर येऊन पोट वाहण्यास मदत होते. असे ना झाल्यास विष्ठेची जागा तुंबुन मरतुक होउ शकते.
साधारण 4 तासांनंतर मक्का भरडा किंवा तांदळाची कणी खाऊ घालावी. दुसऱ्या दिवशी चिक स्टार्टर हे खाद्य पदार्थ सुरु करावेत.
साधारण पहिले 21 दिवस ब्रूडिंग करावे. त्या नंतर पिलांच्या अंगावर पिसे तयार होऊ लागताच ते स्वतः च तापमान स्वतः नियंत्रित करू शकतात. या पुढे काही दिवस पिल्ल शेड मधे सोडावेत आणि नंतर कंपाउंड मधे मोकळे सोडावेत. एक महिना पूर्ण होताच पिल्लाना चिक फिनिशर हे खाद्य पदार्थ सुरु करावेत.
२. – ग्रोइंग – वाढ (4 ते 5 महीने)
ग्रोइंग स्टेज मधे पक्षांची वाढ घ्यायची असते. या अवस्थेत नर आणि मादी पक्षी वेगळे करावेत आणि अनावश्यक नर विकुन टाकावेत किंवा मांस उत्पादनाच्या दृष्टीने स्वतंत्र वाढ़वावेत.
या काळात योग्य शारीरिक वाढ अत्यंत महत्वाची असते. त्यांना मुक्त संचार उपलब्ध करावा व ग्रोवर फीड खाऊ घालव ज्यात 15 ते 16 % प्रोटीन असेल. योग्य प्रमाणात खनिज मिश्रण तसेच जिवनसत्वांचा पुरवठा अपेक्षित आहे.
खालील लसी देऊन घ्याव्यात.
लासोटा बूस्टर
फौलपॉक्स बूस्टर
३. लेयिंग – अंडी घालणे ( 6 ते 18 महीने)
वयाच्या 24 आठवड्यानंतर पक्षी अंडी देण्यास सुरुवात करतात.
या अवस्थे नंतर आपले उत्पादन सुरु होते.
या काळात पक्षांना 18 ते 19 % प्रोटीन युक्त आहार ज्याला लेयींग मेष म्हणतात तो द्यावा. त्यासोबत 5 % कैल्शियम स्त्रोत द्यावा. तसेच अंडी घालण्यासाठी नेस्ट बॉक्स पुरवावेत प्रति 5 कोंबडी एक या प्रमाणात. साधारण वयाच्या 72 आठवड्यांपर्यंत उत्पादन घ्यावे.
४. मौल्टिंग स्टेज
72 आठवडे अंडी दिल्यानंतर पक्षी मौल्टिंग अवसस्थेत जातात, ज्यामधे पक्षी आपले पीसे गाळतात आणि त्याजागी नविन पीसे उगावतात. शक्यतो या अवस्थेत पक्षी कत्तलीसाठी विकावेत. या टप्प्यानंतर उच्च अंडी उत्पादन मिळत नाही.
उत्पन्न-खर्च
शेतकऱ्यांनी एक दिवसाच्या पिल्ला पासून सुरुवात करावी. एक दिवसाचे पिल्लू घेऊन ते अंडयावर येई पर्यंत अंदाजे 120 ते 150 रुपये खर्च होतो.
100 कोंबड्यांपैकी 60 ते 70 माद्या निघाल्यास 40 ते 45 अंडी अंदाजे दररोज मिळणे अपेक्षित आहे. बाजारात या अंडयाला 5 ते 8 रुपये दर मिळतो. येथे आपला एक अंडे तयार करायचा खर्च 2 ते 3 रूपये एवढा होतो.
अंडीविक्रीतील उत्पन्नासोबतच उत्तम असे कोंबडी खत देखील मिळते. घरातील वाया गेलेले अन्न, भाजीपाला, धान्य किंवा आंतरपीक म्हणून घेतलेली मक्का यांचा वापर केल्यास उत्पादन खर्च आणखी कमी करता येऊ शकतो.
72 आठवड्यांपर्यंत उत्पादन घेऊन नंतर हे पक्षी कत्तल केले जावेत. यावेळी सर्वसाधारण 150 ते 200 रूपयाना विकले जातात. हे अतिरिक्त उत्पन्न आणि अतिरिक्त नफा ठरतो.
स्वछ पाणी, योग्य आहार आणि वेळापत्रकानुसार लसीकरण पुरवल्यास घरच्या घरी गावरान कुक्कुटपालन हा अतिशय उत्तम असा व्यवसाय होउ शकतो. आणि अनेक शेतकरी सध्या असे उत्पन्न मिळवत देखील आहेत. गावरान अंडी उत्पादन हे उद्दीष्ट ठेवून कुक्कुट पालन करने अत्यंत फायदेशीर ठरत आहे. गावठी अंडया ला नेहमी चांगला दर मिळत आलेला आहे.
*Latest Updates मिळविण्यासाठी WhatsApp Group ला Join करा.....
Business Mentor Marathi Blog's
घरच्या घरी सुधारित जातीची पिल्ल निर्मिति करुण सुरु करा गावरान कुक्कुट पालन
पिल्ले हॅचरीमधून विकत आणण्याऐवजी हाच व्यवसाय अगदी कमी खर्चा मधे घरीच सुधारित पिल्ल निर्माण करुण व्यवसायाची सुरुवात कशी करावी हे पाहू।
आपल्या घरांत असलेल्या खुडूक गावठी कोंबडी खाली सुधारित जातींच्या कोंबडी ची अंडी उबवून अगदी स्वस्तात सुधारित गावरान पिल्ल निर्माण केलि जाऊ शकतात. सुधारित जातींच्या कोंबड्या जलद वजन वाढ आणि अधिक अंडी उत्पादन देतात तसेच उत्तम रोगप्रतिकार असल्याने परसात सहज संभाळता येतात. ज्यामुळे आपल्या आहारामध्ये चविष्ट आणि पौष्टिक मांस आणि अंडी येतात. त्यापुढे पक्षी आणि अंडी विक्री तुन अतिरिक्त पैसा देखील कमावता येतो.
खुडूक गावठी कोंबडी चा वापर कसा करावा
जर तुमच्या कड़े नैसर्गिक खुडूक बसलेली कोंबडी असेल तर उत्तम !!!
नसेल तर अंडी उत्पादन बंद झालेल्या गावठी कोंबडी खाली एक अंड ठेवावे, ते ती स्वतःच्या पोटा खाली घेऊन बसते. साधारण 5 ते 6 दिवस ती ते अंडे घेऊन बसली की ती खुडूक आहे असे समजावे. या काळात सुधारित जातीच्या कोंबडी ची फ़लित अंडी उपलब्ध करावित.
कोंबडी रोनावर बसवणे
साधारण शेतकार्याने एका वेळेस 1 ते 10 कोंबड्या एकदम रोनावर अंडी उबवण्यास बसवाव्यात जेणेकरून साऱ्या कोंबड्यांना एकत्र मिळून पिल्ल संभाळने सोप्पे जाते आणि मरतुक कमी करता येते.
गोलाकार भांडे किंवा बांबू ची बुट्टी किंवा पाटी मधे भाताचा भूसा अंथरून त्यावर कोंबडी अंडी उबवण्यास बसवावि.
जास्त कोंबड्या एकत्रित रोनावर बसविण्याचे फायदे
1 जेवढी पिल्ल निघतिल ती सर्व एकत्र केलि जातात ज्यामुळे प्रत्येक कोंबडी ला आपली पिल्ल वेगळी काढता येत नाहीत किंवा ओळखता येत नाहीत. नाइलाजाने त्या सर्व पिल्लाना मातृत्वाने संभाळतात.
2 सुरुवातीचे काही दिवस कोंबड्या एकमेकींशी भांडतात पण नंतर मिळून पिल्लांचे संगोपन करतात. याचा असा फायदा होतो की पिल्ल विभागलि गेल्यामुळे योग्य ऊब मिळते जी पिल्लच्या वाढी च्यादृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
3 अनेक कोंबड्या मिळून पिल्ल जेव्हा संभाळतात तेव्हा काही कोंबड्या ह्या नैसर्गिक शत्रुंचे निरिक्षण किंवा पिल्लांचि राखण करण्यात व्यस्त राहतात त्या ऐवजी काही कोंबड्या चारा शोधून पिलांचे पोट भरण्यात व्यस्त राहतात ह्यामुळे कावळा, घार किंवा मांजरा सारख्या नैसर्गिक शत्रुन पासून चांगले रक्षण मिळते.
4 नैसर्गिक शत्रूंमुळे होणारी पिलांची मर कमी होते आणि उत्तम वाढ राहते तसेच नैसर्गिक वातावरणात आई सोबत मुक्त संचारा मधे वाढ झाल्यामुळे पिल्लांचि रोगप्रतिकार क्षमता उत्तम राहाते.
विशेष टीप
हल्ली शहरी लोकसंखेला चांगल्या दर्जाची अंडी अणि चिकन वाजवी दरात उपलब्ध होत नाही. त्यामुळे चांगली किम्मत देऊन चिकन खरेदी करायला लोक तयार असतात.
शहरी भागात विशेषतः ऑरगॅनिक (organic) म्हणजेच नैसर्गिक रित्या हानिकारक औषधे, केमिकल ना वापरता उत्पाद केलेल्या अन्नाची मागणी जोरात आहे, आणि अशा प्रकारे प्रचार केलेल्या अन्नोत्पादनांना भाव देखील अतिशय चांगला मिळतो. म्हणूनच याच अंडयांना व्यवस्थित मार्केटिंग केले तर शहरी भागात ब्रॉयलर अंड्यांपेक्षा जास्त किंमत मिळू शकते. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन डी-मार्ट, रिलायन्स मार्ट अशा व्होलसेलर सोबत करार करण्याचा प्रयत्न करायला हवा.
आपल्या महाराष्ट्रात पीढ़ीजात घरोघरी महिला 5 किंवा 10 कोम्बड्या सांभाळून त्या पासून उच्च प्रथिन युक्त अंडी अणि चिकन आपल्या कौटुंबिक गरजेपुरते मिळवत असत. परंतु व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव, मार्गदर्शन ना मिळाल्याने तसेच जागेची कमतरता या मुळे त्यांची संख्या मर्यादित राहिली. आता वेळ आली आहे की आपण गावीच राहून शहरांत माल पोचवू शकतो आणि अशा प्रकारच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन भरपूर उत्पन्न मिळवू शकतो.
ही माहिती वाचून तुम्ही नवीन व्यवसाय किंवा आहे त्या व्यवसायात प्रगती करून आपली प्रगती आम्हाला कळवा. यानंतरही अधिक माहिती साठी आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणार आहोत.
देशी कुक्कुटपालन बद्दल पॉवरगोठा वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले इतर अतिशय उपयुक्त लेख खालीलप्रमाणे
१. अंडी उत्पादनासाठी देशी कुक्कुटपालन – अंडी कमी मिळण्याची कारणे व त्यावरील उपाय
अंडी उत्पादन घेत असताना किमान 40% आणि कमाल 65% अंडी उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे 100 कोम्बड्यांमागे कमीत कमी 40 अंडी मिळायला हवीत तरच व्यावसायिक स्वरूपात हा धंदा परवडतो. परंतु काही कारणांमुळे बऱ्याचदा अंडी उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. म्हणूनच अंडी उत्पादनाबद्दल शास्त्रोक्त माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. अंडी उत्पादन कमी मिळणे अंडी उत्पादन कमी होण्यामागे काय कारणे आहेत, ते या लेखात सविस्तर चर्चिले आहे.
२. देशी कुक्कुटपालनातील १० महत्त्वाचे प्रश्न
नवीन कुक्कुटपालन करू पाहण्याऱ्या शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका कोंबडी रवणीला बसल्याप्रमाणे घर करून बसत असतात. अशा १० सर्वात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे येथे वाचायला मिळतील.
३. देशी कुक्कुटपालन-कोंबड्यांच्या जाती : ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प
देशी कुक्कुटपालनामधील सर्व महत्त्वाच्या जातींची तोंडओळख फोटो सहित करून देण्याची मालिका. त्यातील पहिली जात म्हणजे ब्लॅक ऑस्ट्रो लॉर्प. काळ्या कोंबडीविषयी पूर्ण माहिती येथे वाचा.
* अशाच विविध प्रकारच्या व्यवसाय विषयी संपूर्ण माहिती साठी लगेच आम्हाला आमच्या Page ला Follow करा.....
* Latest Updates मिळविण्यासाठी WhatsApp Group ला Join करा.....
Business Mentor Marathi Blog's
0 Comments